वारली चित्रकला शिकणाऱ्यांचा हा फोटो अनिल शिंदे यांनी टिपलाय. शिकणाऱ्यांबद्दल किंवा फोटो टिपणाऱ्याबद्दलही या मजकुरात अजिबात अढी नाही. फोटो निव्वळ प्रातिनिधिक आहे. शिकणारे पैसे भरून शिकताहेत. त्यांच्याबद्दल इथं काही चुकीचं लिहिण्याचं काय कारण आहे? तरीसुद्धा वारली चित्रकला शहरात कशी पॉप्युलर झाली, हे पाहणं फार मजेदारच आहे.
ही वारली चित्रं मुळात कारवीच्या काटक्यांनी बनलेल्या, शेणामातीनं लिंपलेल्या घराच्या भिंतींवर काढली जात. ही 'चित्रं' नव्हेत, एकप्रकारे चित्रलिपीच! वारली समाजाची चित्रलिपी. पुरुष, बाई, वाघ, देव, देवी,दैवतांभोवतीची सजावट, शेत, शेतीची कामं, घर, तारपा, कणगी किंवा उखळ, हे सारं दाखवण्यासाठी निरनिराळ्या खुणा. त्या सर्वच समाजाला माहीत असायच्या, कळायच्या आणि लक्षात राहायच्या. 'आमच्याकडे लग्न आहे' हे घराच्या भिंतीवर या वारली चित्रलिपीत 'चौक' काढला तरी पंचक्रोशीत समजायचं. ही चित्रं हेच वारली समाजाचं पोस्टर, तेच घराचं डेकोरेशन, तेच धामिर्क चित्र! अशी मल्टिपल कामं या चित्रशैलीनं वारली समाजासाठी केली.
वारली समाज हा गोदूताई परुळेकर, अनुताई वाघ, ताराबाई मोडक, यांसारख्या समाजसेवकांनी 'जागा केलेला' आदिवासी समाज. या समाजात स्वत:च्या 'चित्रलिपी'ला प्रगत करू पाहणारे कुशल आणि योजक चित्रकार झाले नसते, तरच नवल होतं! यापैकी एक सर्वांत महत्त्वाचे चित्रकार ठरले, जिव्या सोमा मशे. वारली समाजाचं जीवन, या समाजातल्या कथा, या समाजाचे असलेले विश्वास आणि श्रद्धा या सर्वांचं 'डॉक्युमेंटेशन' जिव्या मशे यांनी करून ठेवलं चित्रांमधून. असं म्हणतात की, 'वीव्हर्स सव्हिर्स सेंटर'मध्ये सुमारे 30 वर्षांपूवीर् नोकरी करणाऱ्या भास्कर कुलकणीर् यांनी हा ठेवा प्रथम जगासमोर आणला. त्याचं महत्त्व पटवून दिलं. मग यशोधरा दालमिया यांनी 'द पेन्टेड र्वल्ड ऑफ वारलीज' या इंग्रजी पुस्तकाद्वारे आदिवासी समाजात आधीपासूनच असलेल्या चित्र आणि कथारूप ज्ञानवारशाचं जागतिक ज्ञानभाषेत सुसूत्रीकरण केलं. त्यांना या पुस्तकासाठी मशे यांची फारच मोठी मदत झाली. 'केमोल्ड' या टॉपच्या आर्ट गॅलरीनं वारली आर्ट दाखवण्यात इंटरेस्ट घेतला. केमोल्डनंही वारली आर्टबद्दल माहिती देणारं आणखी एक पुस्तक काढलं आणि या चित्रशैलीबद्दल वारली समाजाचा आपण आदरच केला पाहिजे, हे ठसवलं. जिव्या सोमा मशे जगप्रसिद्ध झाले आहेत. 'फेस्टिवल ऑफ इंडिया'तून फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये ते स्वत: गेले. रिचर्ड लाँग या जागतिक दर्जाच्या चित्रकारानं स्वत:इतकंच महत्त्व देऊन जिव्या मशे यांच्यासोबत एक फिरतं चित्रप्रदर्शन मिलान (इटली) आणि अन्य ठिकाणी भरवलं.
मग आली वारली समाजातल्या चित्रकारांची पुढली पिढी. सामाजिक बदल झपाट्यानं घडताहेत, बाकीच्या लोकांचा 'विकास'च्या आपल्या भकाससुद्धा बनवू शकतो, हे समजणाऱ्या या पिढीनं रेल्वे, शाळा, जीप, शाळा, अगदी डबलडेकर बससुद्धा वारली समाजाच्या चित्रशैलीत चपखल बसवली! विकासाच्या नव्या प्रतिमा या चित्रांमध्ये आल्या. समृद्धीचं दर्शन वारली चित्रांमधून नेहमीच घडे; त्यात या नव्या- अद्याप वारली समाजापर्यंत न पोहोचलेल्या समृद्धीची भर पडली.
'वारली चित्रशैली' खूपच सोप्पी आहे, असं एकंदर लोकांना वाटू लागलं; त्याला झालीत फारतर 15 ते 20 वर्षं! सुमारे सात वर्षांपूवीर् तर, शहरात आणि गुजराती कुटुंबात जन्मलेल्या कुणीतरी वारली आर्ट डिझाइन्सचं एक बुक कम्पाइल केलं. कोणतीही प्रस्तावना नाही, वारली समाज ही चित्रं कशाला काढतो याचा उल्लेखच नाही, अशा धंदेवाईक पद्धतीनं हे 'वारली डिझाइन्स'चं पुस्तक बाजारातही आलं!
आपण शहरी लोक. आपल्याला बाजारातलं डिझाइन आवडतं. छान डिझाइनसाठी आपण वाटेलतेवढे पैसे मोजतो. पण या शहरी लोकांमधले आपण मध्यमवगीर्य! त्यामुळे बाजारातल्यासारखं डिझाइन घरीच करून आपण काटकसर करतो. ही डिझाइन्स मग उशीचे अभ्रे (पिलोकवर!), बेडशीट, टीशर्ट, ग्रीटिंगकार्डस, पॉटस, डिझायनर नोटबुक्स... कश्शावरही आपण वापरतो.
वारली समाजानं ही कला तुम्हाआम्हाला आयतं डिझाइन मिळावं म्हणून निर्माण केली का? वारली चित्रं हा वारली समाजाची स्थिती दाखवणारा भाग होता. ते 'एक्स्प्रेशन' आहे त्या समाजाचं!
आपण वारली कला 'डिझाइन' म्हणून शिकतो. शेत, बाई, तारपा, अशा वारली चित्रांच्या खुणा तेवढ्या आपण शिकतो. वारली समाजानं स्वत:च्या जगण्याचं प्रतिबिंब या चित्रांमध्ये पाडलं; हे माहीत नसेल तर आपण अडाणीच ठरतो!
समाजाचं प्रतिबिंब पाडण्याची शक्ती वारली चित्रांमध्ये आहे.
त्या चित्रांना 'डिझाइन' बनवू नका... किमान शहरात बसून ही 'चित्रलिपी' शिकलात तर त्यात भर तरी घाला... टीव्ही, कम्प्युटर, मोबाइल, वडापाव, हे आपलं जग आहे; त्याचं प्रतिबिंब तुमच्या शहरी वारली चित्रांमध्ये पडतंय का?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1126934
Posted by AYUSH | Adivasi Yuva Shakti» on
-
-
0
comments»
Categories:
11.Media